जिकठाण परिसरात बिबट्याचे दर्शन

Foto
परिसरातील शेतकरी भयभीत : वन विभागाकडून पाहणी
वाळूज महानगर, (प्रतिनिधी) शेतवस्तीवर बिबट्या समोरासमोर दिसून आल्याने शेतकऱ्यांची पाचावर धारण बसली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना जिकठाण (ता. गंगापूर) शिवारातील रोकडे वस्ती येथे शुक्रवारी (दि.१४) सायंकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, खुलताबाद परिक्षेत्राच्या वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून त्यांना बिबट्याचे ठस्से आढळून आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पुणे महामार्गावरील २० नंबर खोलीच्या पुढे जिकठाण येथे जाण्याचा रस्ता आहे.
थोडे पुढे रोकडे व बोडके वस्ती आहे. शुक्रवारी सायंकाळी येथील संतोष बोडखे हे जात असताना बंद पडलेल्या एका कंपनीजवळ त्यांच्या समोरच बिबट्या आला. सुदैवाने त्याने
त्यांच्यावर हल्ला केला नाही.
शेतात पळून गेला. ही वार्ता बाजूच्या सांगळे, जाधव वस्तीवर वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांबरोबरच थोड्या वेळानंतर तो बाजूच्या
स्थानिक नागरिकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, नागरिकांनी जागरूक खुलताबाद वनक्षेत्राच्या वन अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्यानंतर येथील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता त्यांना अनेक ठिकाणी बिबट्याचे ठस्से उमटलेले आढळून आले. त्यामुळे त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, बिबट्या हा प्राणी चपळ असून एकाच ठिकाणी सहसा तो थांबत नाही. असे यांनी केले आहे. असले तरी शेतकऱ्यांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. असे आवाहन वनाधिकारी किसन बमनावत यांनी केली आहे.